बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने महापुरूषांची संयुक्त जयंती व स्मृतीदिन साजरा होणार!

(म्हसळा ता.प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)

बहुजन क्रांती मोर्च्या च्या वतीने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,राष्ट्रसंत तुकाराम महाराज,राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले, राष्ट्रसंत सेवालाल महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत नामदेव महाराज यांची संयुक्त जयंती व आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा स्मृती दिन साजरा करण्यात येत आहे.

19 फेब्रुवारी 2021 रोजी,म्हसळा येथे वेळ 10:00 ते 2:00 दरम्यान, स्थळ-घनसार काम्पलेक्स मॅरेज हॉल म्हसळा येथे हा संयुक्त जयंती व स्मृतीदिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास उद्धघाटक म्हणून मा.अमित शेंडगे साहेब,प्रांत अधिकारी श्रीवर्धन, विशेष उपस्थिती मा.शरद गोसावी-तहसीलदार, डॉ.वाय.एस प्रभे-बी.डी.ओ म्हसळा, मा.सौ.उज्वला सावंत, मा.बी.बी तरवडवे- ग.शि.म्हसळा, मा.सौ.जयश्री कापरे,अनिल ठाकूर-गट समन्वयक,मा.के.टी भिगारे-नायब तहसीलदार, बबन मनवे, श्री.धनंजय पोरे-पोलीस निरीक्षक, मा.संतोष शेडगे, मा.आंग्रे, मा.गायकर-उपसभापती, प्रमुख उपस्थिती मा.महादेव पाटील-अध्यक्ष कुणबी समाज, मा.महादेव पाटील-अध्यक्ष आगरी समाज, मा.अनिल बसवत-अध्यक्ष कोळी समाज, मा.प्रसाद करंबे-अध्यक्ष शिंपी समाज, मा.महंमद अली पेणकर -अध्यक्ष मुस्लिम समाज, मा.अनंत येलवे-अध्यक्ष बौद्ध समाज, मा.हिरामण चव्हाण-अध्यक्ष बेलदार समाज, मा.निलू चव्हाण-अध्यक्ष गोर बंजारा समाज, मा.सुभाष वावटकर-अध्यक्ष रोहिदास समाज, मा.नईम दळवी-कोकण किनारा मित्रमंडळ, मा.सुरेश जाधव-बौद्ध महासभा, मा.रोशन कासारे-अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, मा.रमेश डोलकर-कार्यकर्ते कोळी समाज, मा.प्रा.महंमद शेख, जेष्ठ पत्रकार विचारवंत मा.लक्ष्मण चांग्या पाटील-मेंदडी कोळी समाज, विनय कुमार सोनावणे-अनिस समिती आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

तमाम बांधवानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन बहुजन क्रांती मोर्च्याकडून करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्या