खुनाच्या प्रयत्नातील आरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर ; आरोपीची बाजू ॲड.सुरेश पिडगेवार तमलुरकर यांनी मांडली.

धुळे जिल्हयातील देवपूर येथे दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तक्रारदार हा त्याचा मित्रला घरी सोडून परत जात असताना काही एक कारण नसताना आठ आरोपी मिळुन कोयत्याने आणि चौपराने डोक्यावर हातावर पायावर पाठीवर मारून गंभीर दुखापत केली.
त्यामुळे डोक्यातून रक्त येऊ लागल्याने तक्रारदार घाबरून तेथून पळून जाऊन देवपूर पोलिस स्टेशन येथे जाऊन आरोपी सोनू चव्हाण, हरीश गिरसे व इतर सहा लोकाविरोधात कलम 307 भा.द.वी. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मुख्य आरोपी सोनू चव्हाण व हरीश गिरासे यांनी मा.जिल्हा व सत्र न्यायालय धुळे. येथे जामिन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज मा. जिल्हा व सत्र न्यायालयानी फेटाळून लावली. त्या नाराजीने आरोपीने मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मुख्य आरोपी सोनू चव्हाण व हरीश गीरासे यांची बाजू व सरकारी वकील या दोघांची बाजु ऐकून मा. न्यायमुर्ती र. जी. अवचट साहेबांनी आरोपींना जामीन अर्ज मंजूर केला. त्यावेळी मुख्य आरोपीची बाजू ॲड सुरेश पिडगेवार तमलुरकर यांनी मांडली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या