अक्ट्राॅसिटी गुन्ह्यातील दोन आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला !

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
नायगाव पोलिस स्टेशन येथे दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी आरोपी नामे प्रदीप काशिराम बाळापूरे , संगमेश्वर बाळापूरे, आणि राजेश बाळापूरे व इतर लोकांवर अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा)कलम 3 (1)( r),3(1)(s),3(2)(va)आणि भा. द. वि. 326,452,324 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 सप्टेंबर 2022 रोजी फिर्यादी व आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाल्याने गावातील पंचांनी मध्यस्ती करुन तो वाद मिटवला होता.
दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी फिर्यादीच्या काकाच्या घरी गोड जेवणाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी व त्यांचे पाहुणे जेवण करते वेळेस आरोपीतानी तेथे जावून मागच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या काकांच्या घरी सर्व आरोपी जाऊन फिर्यादी हा अनुसूचित जमातीचा असल्यामुळे त्यांना जातीवाचक शिव्या देत त्यांना मारहाण केली होती.सदरील अरोपी जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालय बिलोली येथे अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता. मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकुन जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपींनी मा. उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. फिर्यादी गजानन परके यांच्या वतीने ॲड. सुरेश एस. पिडगेवार व सुनील राठोड यांनी बाजू मांडली. आरोपी प्रदीप बाळापुरे हा उच्च न्यायालयात अटपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यावर पोलिसांनी अटक करण्यात आली होती. त्यामूळे त्यांचा अर्ज आरोपीच्या वकिलांनी मागे घेत उर्वरित आरोपी तर्फे युक्तिवाद केले होते.
मात्र फिर्यदीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून सदर जामीन अर्जातील आरोपी संगमेश्वर बाळापूरे आणि राजेश बाळापूरे यांचा जामीन अर्ज मा. उच्च न्यायालय,औरंगाबाद खंडपीठाने मा.न्यायमूर्ती आर जी अवचट व आर. एम.जोशी यांनी दोन्ही वकिलांची बाजू ऐकुन अरोपितां पैकी दोघांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यावेळी फिर्यदीची बाजू ॲड. सुरेश पिडगेवार यांनी मांडली व सुनील राठोड यांनी सहकार्य केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या