कबड्डीच्या सामन्यात बजरंग क्रीडा मंडळ प्रथम !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील मिलिंद प्राथमिक शाळेच्या समोरील मैदानात राष्ट्रसंत भगवान बाबा कबड्डी संघाच्या वतीने खुल्ले कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते, यामध्ये बिलोली येथील बजरंग क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

          कुंडलवाडी येथील वंजार गल्लीमधील राष्ट्रसंत भगवान बाबा कबड्डी संघाच्या वतीने शहर व परिसरातील क्रीडाप्रेमी साठी दिनांक 26 व 27 मार्च रोजी खुल्या कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते,या कबड्डी सामन्याचे उद्घाटन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, डॉ नरेश बोधनकर,यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या खुल्या कबड्डी सामन्याच्या स्पर्धेसाठी शहर व परिसरातील जवळपास वीस संघ सहभागी झाले होते,या सर्व संघातून सर्वप्रथम येण्याचा मान बिलोली येथील बजरंग क्रीडा मंडळ यांना मिळाला आहे. या संघाला कै. पोतोजी गंगोणे यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक 7777 रुपये व स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले,द्वितीय क्रमांक वंजारी बॉईज या संघाने पाठविला आहे, यांना कै.अनिल गंगोणे यांच्या स्मरणार्थ 5555 रुपये व स्मृती चिन्ह देण्यात आले तर तृतीय क्रमांक भगवान बाबा कबड्डी संघ कुंडलवाडी यांना कै अनिल सरोदे यांच्या स्मरणार्थ 3333 रुपये व स्मृती चिन्ह देण्यात आले.
          यावेळी भीम पोतनकर,रमेश करपे ,संजय भास्कर, नागेश साठे, किरण हमंद, शिवकुमार गंगोने, राजशेखर माहेवार, शिवकुमार खांडरे, दत्ता हमंद, दत्ता भोरे, राजेश दुप्तले, सौरभ कळसाईत, सय्याराम भोरे, लक्ष्मण गंगोणे, कैलास माहेवार, राजू माहेवार, आदिसह वंजारी समाज बांधव व प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या