नायगाव येथील जनता प्राथमिक शाळेच्या वतीने बाल महासभेचे आयोजन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील जनता हायस्कूल मध्ये दिनांक08 ऑगस्ट सोमवार रोजी अमृत महोत्सवा निमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले. अमृत महोत्सवा निमित्ताने नायगाव येथील जनता हायस्कूलमध्ये बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते.     
या बाल सभेचेआध्यक्ष – कु.रुतुजा शिंदे, उपाध्यक्ष – कु. वर्षा पिंपळे, प्रमुख पाहुणे -भगवान चव्हाण हे लाभले तर, सूत्रसंचालन – श्रुती हंबर्डे हिने केले.
त्यानंतर बालसभेला सुरवात झाली व विद्यार्थ्यांची सभा रंगू लागली . यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र दिनावर, थोर पुरुषावर चर्चा केली.
यामध्ये श्री गंगाधर चव्हाण सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर नारे जी.जे, तमलुरे एल.एस, सौ.जमादार एस.एस, नागठाणे एस.एस, .बावणे पी.एस, सौ गट्टेवार एस.डी, टाकळे एस.जी, जाधव एस.एस, लंगडापुरे एस.एस, गाडले जी. एन, कोलमवार पी.एच, श्री लोंढे डि.जी, शेख गुलाब सरवरसाब यांचे सहकार्य लाभले.
शेवटी आभार प्रदर्शन संकेत वाघमारे ह्याने केले. अशा प्रकारे बालसभा संपन्न झाली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या