नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात अधिक मासानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या तिरुपती तिरुमला प्रतिष्ठान समजले जाणारे नरसी भगवान बालाजी मंदिरात अधिक मासानिमित्ताने महा अभिषेक पूजा, सव्वा लाख तुलसी अर्चना, राम कृष्ण हरी नामजप व तेहतीस ब्राह्मण जोडप्यांना साडी चोळी, भोजन, विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा भावीक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

नायगाव तालुक्यातील नरसी फाटा येथे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या प्रती तिरुपती तिरूमला समजल्या जाणाऱ्या भगवान बालाजी मंदिरात अधिक मासानिमित्ताने विष्णू भगवान बालाजीची अनन्या भावाने सेवा करणाऱ्यांना विशेष पुण्य फल प्राप्त होते असे सर्व ग्रंथातून सांगण्यात येते.

त्याच निमित्ताने भगवान बालाजी मंदिराच्या मूर्तीचा अभिषेक महापूजा महाआरती सव्वा लाख तुळसी अर्चना संगीतमय वातावरणात राम कृष्ण हरी नाम जप करण्यात आला.

यावेळी पुणे येथील अक्षरधाम स्वामीनारायण मंदिरातील साधुसंतांनी हजेरी लावली भाविकांना अधिकमासानिमित्ताने महत्त्व पटवून सांगितले तसेच तेहतीस ब्राह्मण जोडप्यांना भोजन साडी चोळी वस्त्र देण्यात आली. यानिमित्ताने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यानिमित्ताने तालुक्यासह परिसरातील महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी मंदिर प्रशासनाच्या वतीने चांगल्या प्रकारे कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या