एसटी वाहक बालाजी नरवाडेची पाच वर्षापासून पाणी वाटप सेवा चालू

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
एसटी महामंडळ सेवेत कार्यरत असलेले वाहक बालाजी दिगंबरराव नरवाडे हे बिलोली आघार येथे कार्यरत असून त्यांची कार्यसेवा नरसी कारेगाव धर्माबाद बिलोली या मार्गावर असून ते गेल्या पाच वर्षापासून उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना मोफत पाणी वाटण्याची सेवा कायम ठेवली आहे.
काही माणसं ध्येयवादी असतात तर एखादे काम केलं पवित्र समजल्या जाते आणि म्हणून एसटी महामंडळ कार्यक्षेत्रात असूनही बालाजी दिगंबरराव नरवाडे हे गेल्या पाच वर्षापासून लोकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोफत पाणी पुरविण्याचे काम करीत असून त्यांनी आगार प्रमुख सुभाष पवार आणि वाहतूक निरीक्षक विशाल निवडुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाणी वाटप उपक्रम गेल्या पाच वर्षापासून सातत्याने राबवीत आहेत तसेच वारकरी संप्रदायाचा अनुभव असल्याने सतत उपक्रम मी राबवित आहे असेही ते आवर्जून म्हणाले. आपलं कार्यक्षेत्र एसटी महामंडळ हे असताना त्यांनी एक जून 2023 या दिवशी एसटी महामंडळाचा अमृत महोत्सव असुन या अनुषंगाने प्रवाशासाठी पाणी पाजविणे ही सेवा फारच पवित्र आहे असे तेच स्वतः समजतात. बालाजी दिगंबरराव नरवाडे हे मूळचे नायगाव तालुक्यातील राहेर या गावात त्यांचा जन्म झाला असून वारकरी संप्रदायात घराण्यातली एक परंपरा चालावी या उद्देशाने गेल्या पाच वर्षापासून त्यांनी ही पाणी वाटप ची पवित्र सेवा सातत्याने करीत आहे तर ते आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.भगवताचार्य संजय महाराज हिवराळे देव आळंदी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा करताना मला याचा मनस्वी आनंद वाटत आहे असेही ते म्हणाले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या