बालाजी पेटेकर “बाबा तुमच्यासाठी” उपक्रमांतर्गत कुलगुरूंच्या हस्ते सन्मानित”

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी:- गजानन चौधरी ]
लेकराच्या भल्या पाई करती जीवनाची राख… संसाराच्या सायकलचे मायबाप दोन चाक… या हृदयाला भिडणाऱ्या बालाजी पेटेकर यांच्या कवितेनी कार्यक्रमाची सुरुवात विष्णुनगर नांदेड येथे झाली. संस्कृतीचे विकृतीकरण होत असताना मातृ पितृ देवो भव ही व्याख्या बदलताना समाजाचे काही आपण देणे लागतो या उदात्त भावनेने कार्यक्रमाचे केले गेले.
पत्रकार म्हणजे समाजातील उनिवा दाखवून देणारे असा समज खोडून काढून सामाजिक जाणीवा उजागर करणारे जेष्ठ पत्रकार गोविंदराव मुंडकर यांच्या वडिलांच्या कै. बसवंतराव मुंडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली चे ज्येष्ठविधीज्ञ ॲड.धोंडीबा पवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक विद्यापीठाचे कुलगुरू उद्धवराव भोसले ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव मुंडकर यांच्या उपस्थितीत बाबा तुमच्यासाठी मानाचा सन्मान प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक,कवी बालाजी पेटेकर खतगावकर यांना देण्यात आला. शाल हार तुरे अशा परंपरागत सन्मानास फाटा देऊन वृक्ष देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास माजी जि.प.अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला उपक्रमशील शिक्षक बालाजी गेंदेवाड सर, मुख्याध्यापक ईळेगावे सर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृती लयास जात असताना कौटुंबिक संस्था संस्कारहीन होतअसतांना कुलगुरू उध्दवराव भोसले यांनी अशा उपक्रमांचे विशेष कौतुक केले.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी सौ.ललिताताई मुंडकर श्री व सौ भांडवलकर,श्री चंचलवाड,श्री देशपांडे,युवा पत्रकार बसवंत मुंडकर,मुख्याध्यापक कल्याण सर यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या