नरसी भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडवा निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तिरुपती तिरुमला प्रति रूप समजले जाणाऱ्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडवा निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र सीमेल लागत असलेल्या नांदेड ते देगलूर महामार्गावर नरसी येथे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे नवसाला पावणाऱ्या तिरुपती तिरुमल्ला समजले जाणाऱ्या श्री भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडव्या निमित्त मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांनी विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले होते.

गुढ्या उभारून येणाऱ्या भाविकांचे मंदिराच्या वतीने स्वागत करण्यात आले तर विधिवत वेद मंत्रोच्चारात भक्तिमय वातावरणात विष्णुसहस्रनाम पाठ करीत पहाटे पाच वाजता भगवान बालाजी मूर्ती लक्ष्मी पद्मावती मूर्तीचे108 कलश महा अभिषेक पूजा, महाआरती ,महाप्रसाद, दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजता भगवान बालाजीचे गरुड वाहन सेवा टाळ मृदंगाच्या तालावर बँड पथकाच्या सह अतिशयबाजीत भव्य दिव्य मिरवणूक नरसी श्रीभगवान बालाजी मंदिर येथून नरसी येथील मुख्य चौकात प्रदक्षिणा घालून वापस हीच मिरवणूक मंदिराकडे वापस आल्यानंतर महाआरती करण्यात आली.
तसेच आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे योग्य रीतीने दर्शन व्हावे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने व पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या