नरसी बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव दर्शनासाठी भाविकांची गर्दी

[ नायगाव ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी फाटा आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक सेमेलगत असलेल्या नरसी फाटा येथील भगवान बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र सिमे लागत असलेल्या नरसी फाटा येथे तिरुपती तिरुमला प्रतिरुप समजले जाणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बालाजी मंदिरात स्वातंत्र्य सैनिक कै उद्धवराव मेडेवार यांनी 26 वर्षापूर्वी मंदिरात बालाजीची मूर्ती स्थापना केली.

नवरात्र महोत्सव निमित्ताने मंदिराला विविध फुलाने सजवून भव्य दिव्य सभा मंडप तयार करून विद्युत रोषणाई तयार केली असून सकाळी सहा वाजता वेद पंडित यांच्या मंत्रोच्चारात महाभिषेक, पूजा अर्चा, आरती होम हवन, महाप्रसादाने सुरुवात झाली. मुहूर्तावर भव्य दिव्य रथ मिरवणूक काढण्यात आली भाविकानि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दर्शन सुलभ व्हावे म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली.

मंदिर प्रशासकीय अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, विश्वस्त श्रीराम उद्धवराव मेडेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवरावआप्पा बेळगे, भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगाव, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार ,प्रसिद्ध व्यापारी नंदकुमार मडगूलवार, राजेश पा भिलवंडे, बाबुराव शक्करवार, भाजपा शहराध्यक्ष शंकर पा कल्याण, अविनाश कोडगिरे,प्रसिद्ध व्यापारी वसंतराव मेडेवार, विठ्ठल सावकार लाभशेठवार, चंद्रकांत कवटीकवार, राजेश्वर मेडेवार, मोहन पा भिलवंडे, संगमनाथ सावकार कवटिकवार, सदानंद मेडेवार,बालाजी वट्टमवार, बालाजी चिंतावार, साईनाथ मेडेवार, पवन गादेवार, मनोज अरगुलवार, साईनाथ वट्टमवार, अनिल शिरमवार, नारायण देवशेटवार, ज्ञानेश्वर वासुदेव महाराज , किशोर महाजन,यांच्यासह सर्व विश्वस्ताने महोत्सवांमध्ये भाग घेऊन दसरा नवरात्र महोत्सव थाटात साजरा केला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या