नरसी बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव थाटात साजरा

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आंध्रा, कर्नाटक ,महाराष्ट्र सेमेलगत असलेल्या तिरुमला तिरुपती प्रतिरूप समजले जाणाऱ्या भगवान बालाजी मंदिरात दसरा नवरात्र महोत्सव निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या तिरुपती तिरुमला प्रतिरूप समजले जाणाऱ्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी नवरात्र महोत्सव निमित्ताने नऊ दिवस पहाटे चे भगवान बालाजी मूर्तीस महाअभिषेकपूजा , महाआरती, विष्णुसहस्त्रनाम, कल्याणउत्सव दीपोत्सव, कुंकुमार्चना, शेषनाग वाहन, अश्व वाहन, सूर्यप्रभा वाहन, चंद्रप्रभा वाहन, कल्पवृक्षवाहन, हंस वाहन, गरुड वाहन, हनुमानवाहन, गजवाहन, अस्टोत्तर कलश महाअभिषेक तर दसऱ्याच्या दिवशी टाळ मृदंग, लेझीम ,ढोल ताशा, बँड पथकासह, अतिशबाजित रथोत्सव भव्य दिव्य मिरवणूक महिला, पुरुष बाल गोपाळ, मुलं यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

दसरा नवरात्र निमित्ताने दर्शनासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दर्शनासाठी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, आमदार राम पाटील रातोळीकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, हनमंतराव पाटील चव्हाण, श्रीराम सावकार मेडेवार,श्रावण पाटील भिलवंडे , वसंत सावकार मेढेवार, बालाजी बच्चेवार, राजू सावकार मेडेवार,राजेश पाटील भिलवंडे, सदानंद मेडेवार, नंदकुमार मडगुलवार, राम सावकार पत्तेवार, डॉक्टर बिलोलीकर, संगमनाथ सावकार कवटीकवार, बाबुराव शक्करवार,संभाजी पाटील भिलवंडे, चंद्रकांत सावकार कवटीकवार, रवींद्र पाटील भिलवंडे, मोहन पाटील भिलवंडे, उत्तम सावकार वट्टमवार, दत्तात्रय लोकमानवार, बाबू सावकार आरगुलवार, शंकर पाटील कल्याण, बालाजी मेडेवार, डॉक्टर पोलावार, यांच्या सह बालाजी मंदिराचे संचालक मंडळ, व्यापारी, आर्य वैश्य समाज नवयुवक मंडळ मोठ्या संख्येने भावीक उपस्थित होते. नवरात्र महोत्सवाच्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते नवरात्र काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या