नरसी भगवान बालाजी मंदिरात भक्ताच्या वतीने प्रभावळ अर्पण !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नरसी नांदेड महामार्गावर असलेल्या भाविकाचे श्रद्धास्थान तिरुपती तिरुमला प्रति स्वरूप समजल्या जाणाऱ्या नवसाला पावणारा नरसी येथील भगवान बालाजी मंदिर श्रावण मासाचे निमित्य साधून भगवान बालाजी मूर्तीचा ज्ञानेश्वर महाराज यांनी अभिषेक पूजा, महाआरती करण्यात आली फुलांनी सजवण्यात आले होते तसेच दानशूर कै. विठ्ठल गोविंद कवटीकवार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती विमलबाई विठ्ठल कवटीकवार यांनी श्री बालाजी चरणी चांदीचे प्रभावळ अर्पण केले.
श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार असल्यामुळे भाविकांनी दर्शनाची गर्दी केली होती यावेळी श्रीराम उद्धवराव मेडेवार, श्रावण पा भिलवंडे, बाबुराव शक्करवार, प्रदीप ्चाडावार, रवी कोटलवार, डॉक्टर राचेवाड, मोहन पा भिलवंडे, वसंतराव मेडेवार, शंकर पा कल्याण, राजेश्वर मेडेवार, दत्तात्रय लोकमणवार, डॉक्टर पोलावार, साईनाथ वट्टमवार, पांडुरंग पा वडगावकर, प्रकाश कवटीकवार, सदानंद मेडेवरमेश मेडेवार, गजानन चौधरी, गजानन भिलवंडे, व्यंकटराव कोकणे,सूर्यकांत कवटीकवार, साईनाथ मेडेवार, पवन गादेवार, मनोज आरगुलवार, सुभाष चल्लावार , विनोद बच्चेवार आदि जण उपस्थित होते,
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या