नरसी भगवान बालाजी मंदिरात २७ व्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तिरुमला तिरुपती प्रतिरूप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या नरसी भगवान बालाजी मंदिरात 27 नवरात्र महोत्सवाची महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

स्वातंत्र्य सैनिक कै उद्योगपती उद्धवराव मेडेवार यांच्या प्रयत्नातून आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत हैदराबाद महामार्गावर असलेल्या नरसी फाटा येथे सव्वीस वर्षांपूर्वी भव्य दिव्य अशी तिरुपती तिरुमला मंदिर ट्रस्टच्या वतीने दिलेली मूर्तीची स्थापना करण्यातआली त्याच मूर्तीच 27 वा वार्षिक नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई व जागोजागी भाविकांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत दिनांक 15 ऑक्टोबर रविवार ते 24 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

असून या निमित्ताने वेदशास्त्र पंडित ब्राह्मण यांच्या हस्ते पहाटे 5,30, ते 7,30, महाभिषेक 8,ते 11 वाहन मिवणुक, घटस्थापना ,गणेश पूजन ,अंकुर अर्पण ,कंकण बंधन ,होम हवन, पूजन, विष्णुसहस्त्रनाम, पुष्पा अर्चना, कुंकुम अर्चना ,तुलसी अर्चना , सहस्त्रदीप अलंकार, वसंत उत्सव ,कल्याण उत्सव, पालखी सेवा , वाहन सेवा मिरवणूक, नवरात्र विशेष 108 कलश महाअभिषेक पूजा , भाविक भक्ता कडून भगवान बालाजी मंदिरात अर्पण केले जाणारा महाप्रसाद दररोज विविध पदार्थाने गंगाळे दाखवण्यात येणार दहीभात, फुल हरा, केशर भात, चना ,शिरा ,पोंगल , विविध व्हेजीटेबल फळाने ड्रायफ्रूटने मिश्रित भात, वडा, बुंदी लाडू , दिनांक 15 ऑक्टोबर रोजी शेष वाहन ,16 ऑक्टोबर हंस वाहन ,17 ऑक्टोबर रोजी अश्व वाहन ,18 ऑक्टोबर रोजी सूर्यप्रभा वाहन १९ ऑक्टोबर हनुमंत दिनांक 20 ऑक्टोबर रोजी गरुड वाहन, 21 ऑक्टोबर रोजी हनुमान वाहन, 22 ऑक्टोबर गज वाहन 23 नोव्हेंबर रोजी 108 कलश महाभिषेक, चंद्रप्रभा वाहन, दसऱ्याच्या दिवशी रथोत्सव, भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दसरा महोत्सवानिमित्ताने महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी श्री भगवान बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने नायगाव येथील उद्धवराव कॉम्प्लेक्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन बैठक घेण्यात आली.
यावेळी अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, श्रीराम मेडेवार, बाबुराव शक्करवार, संगमनाथ सावकार कवटीकवार, वसंतराव मेडेवार, भगवानराव लंगडापुरे, शंकर पाटील कल्याण, राजेश्वर मेडेवार,चंद्रकांत कवटीकवार, सदानंद मेडेवार, डॉक्टर पोलावार,सतीश मेडेवार, गजानन चौधरी ,नगरसेवक संजय पाटील चव्हाण ,पांडू पाटील चव्हाण ,विठ्ठल बेळगे, विठ्ठल सावकार लाभशेटवार, अतुल कवटीकवार, सतीश लोकमानवार, साईनाथ वट्टमवार, प्रदीप देमेवार, विनोद बच्चेवार, संगम सेट गंदेवार, पवन गादेवार, साईनाथ मेडेवार, हनमंत चव्हाण, रमेश मेडेवार यांच्यासह प्रमुख व्यापारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या