नरसी बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशी निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
तिरुपती तिरूमला प्रतिरोध समजले जाणारे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नरसी भगवान बालाजी मंदिरात मंदिरात एकादशी निमित्ताने दर्शनासाठी भावीकांनी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा सी मे लगत असलेल्या नरसी फाटा भगवान बालाजी मंदिरात महा अभिषेक पूजा महाआरती महाप्रसाद तसेच आयोध्या येथून 22 जानेवारी रोजी राम मंदिरात मूर्ती स्थापना होणार असल्यामुळे भाविकांनी त्या दिवशी दिवाळी साजरी करून स्वागत करावे असे आवाहन करण्यात आले.

या निमित्ताने अक्षदा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिराचा गाभारा अंगूर विविध फळांचे आरास करून सजवण्यात आला होता भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी मंदिराचे विश्वस्त श्रीराम मेडेवार , माणिक लोहगावे , वसंतराव मेडेवार, बाबुराव शक्करवार, शंकर पाटील कल्याण, सूर्यकांत सोनखेडकर, डॉक्टर पोलावार, रमेश मेडेवार, साईनाथ वट्टमवार, गोविंद नरसीकर, गजानन चौधरी, साईनाथ मेडेवार,मनोज आरगुलवार, बालाजी वट्टमवार, पवन गादेवार, विनोद बच्चेवार, अनिल सावकार, नारायण देवसेटवार, यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या