धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे महामानव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन.
धर्माबाद ( ता.प्रतिनिधी)
भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार महामानव, विश्वरत्न,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमीत्त तालुक्यातील बाळापूर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे महामानव डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.६ डिसेंबर रोजी सकाळी आयोजीत करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय, महाकारूनीक, तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुण अभिवादन व सामुदायीक
आदरांजली वाहीन्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला पोलीस नि. सोहन माछरे ,सामाजीक कार्यकर्ते गंगाधर सूर्यवंशी, साहेबराव सोनकांबळे ,भीमराव खंडेलोटे ,किर्तीराज गायकवाड ,चंद्रभिम हौजेकर, गंगाधर जाधव , बळीराम घाटे,माजी.नगरसेवक सुधाकर जाधव ,गंगाधर कोठारे,विजय सूर्यवंशी,गंगाधर सूर्यवंशी,लक्ष्मीकांत सूर्यवंशी,शंकर सोनकांबळे,देविदास पहेलवान
व लहान बाळापासून ये मोठ्या वर्गापर्यंत सामाजिक कार्यकर्ते यावेळी विश्वरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरीनिर्वाण दिनानिमीत अभिवादनपर सामुदायीक आदरांजली वाहीली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रभिम हौजेकर ,व साहेबराव सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भीमराव खंडेलोटे यांनी व्यक्त केले.