बाळापुरला जाणारा रस्ता बनला प्राणघातक, सा.बां.विभागाला भाजपा व हिंदू युवा संघटनेचा तिव्र आन्दोलनाचा इशारा !

(धर्माबाद प्रतिनिधी- नारायण सोनटक्के)

शहरातील आंध्रा बसस्थानकापासून धर्माबाद नगरपालिकेचे अंतर्गत असलेल्या मौजे बाळापुर कडे जाणारा रस्ता जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकक्षेत येतो तो पूर्णतः उखडला असून त्यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

म्हणून ह्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारतीय जनता पक्ष व हिंदू युवा संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे. धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत मौजे बाळापुर हे गाव येते.

हा रस्ता तेलंगाना बसस्थानकापासून बाळापुर कडे जातो. पुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रेल्वे गेट ते जन्मभूमी ते कर्मभूमी या राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. हा रस्ता जागोजागी उघडला असून, रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले आहेत,या रस्त्यावरून नेहमीच वाहनधारकांची वर्दळ असते. वाहनधारकांना आपले वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असून, दिवसागणिक अपघाताच्या संकेत खड्डे चुकवताना वाढ होत आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच हे खड्डे चुकवताना एका तरुणांचा अपघात होऊन बळी गेला होता. या खड्डेमय रस्त्यांमुळे धर्माबाद सुशोभिकरणलाही कलंक लागत असून हा रस्ता शहराचे सौंदर्य वाढविण्यास एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या शिवराम सागर तलावावरून जातो. पण ह्या रस्त्याचा च्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे.

उपरोक्त पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व हिंदू युवा संघटना आता आक्रमक झाली असून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तथा हिन्दू युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश भाऊ मोटकूल यांच्या नेतृत्वात आज सार्वजनिक बांधकाम विभागात या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. हा रस्ता जर लवकरनूतनीकरण करण्यास उशीर झाला तर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला.

आहे यावेळी हिंदू युवा संघटनेचे अध्यक्ष सतीश मोटकूल भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रामेश्वर गंधलवार, सोशल मीडिया विभागीय प्रमुख साईनाथ शिरपूरे, सज्जन गड्डोड, अमित मुंदडा, भोजन्ना सौडलवार, सिंनू रेड्डी, लक्ष्मण संम्बटवार, बालाजी संम्बटवाड,ट्रायल आहे तुम्ही भाजपा मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष चैतन्य घाटे, बालाजी पवार, पवन पतरोड, रोहित सुरकुटवार, रवी ऐनलोड, अरविंद मोटकूल आदी सक्रिय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या