ॲड.बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर 6 जानेवारी रोजी नांदेड दौऱ्यावर !

[ विशेष प्रतिनिधि / रियाज पठान ]
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर हे दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून दुपारी 2:00 वाजता त्यांचे विशेष हेलिकॉप्टरने नांदेड येथे आगमन होईल. दुपारी 4:00 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार असून त्यानंतर रात्री 6:00 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.
 रात्री ते नांदेड येथे मुक्कामी असून दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी ते नांदेडहुन तेलंगणा प्रदेशातील म्हैसा येथे सभेसाठी रवाना होणार आहेत. परतीच्या प्रवासात ते नांदेडहुन पुण्याकडे प्रयाण करणार आहेत अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले व महासचिव शाम कांबळे यांनी दिली आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मोठ्या शस्त्रक्रिया नंतर ते पहिल्यांदाच नांदेड शहरात येत असून त्यांच्या स्वागतासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार तयारी सुरू असल्याचे कळविण्यात आले आहे.
तर देगलुर बिलोली मतदार संघातुन जास्ती जास्त कार्यकर्ते साहेबाच्या स्वागताला व कार्यक्रमाला उपस्थीत रहावे असे अहवान वचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी केली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या