माहीती आधिकार-पत्रकार संरक्षण समिती लोहा तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब बुध्दे यांची निवड!

विशेष प्रतिनिधी/ रियाज पठान

केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता प्राप्त नॅशनल सोशालिस्ट पार्टी ( एनएसपी ) संलग्न माहीती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या लोहा तालूकाध्यक्षपदी
बेरळी (खुर्द)येथील धडाडीचे युवा पत्रकार बाळासाहेब बुध्दे यांची नियुक्ती करण्यात आली.

माहीती आधिकार आणि पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहीती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे व समस्त विभाग आघाड्यांच्या मार्गदर्शिका अमृताताई भंडारी आणि प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनात नांदेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल रामदासी यांच्या शिफारशीने राष्ट्रीय समाजवादी विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही समाजवादी संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहीती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची
जबाबदारी समितीच्या वतीने देण्यात येत असते.

ही जबाबदारी पत्रकार बाळासाहेब बुध्दे यांचे वर सोपवण्यात आल्याची माहीती जिल्हाध्यक्ष सुनिल रामदासी यांनी दिली आहे,त्यांच्या या निवडी बदल पत्रकारीता,राजकीय,सामाजिक,वैद्यकिय,शैक्षणिक, व्यापारी अशा विविध क्षेत्रातून त्यांचे स्वागताचा वर्षाव होत आहे.

पार्डीचे चे पॅनल प्रमुख माधव पा.पवार,लालसेना जिल्हाध्यक्ष हनमंत कंधारे,कार्याध्यक्ष यादव कंधारे, प्रेरक संघटना नांदेड जिल्ह्याध्यक्ष पि. आर.चीखलभोसिकर, स्वाभिमानी भीमसेना तालुकाध्यक्ष विलास सावळे, पं. स. लोहाचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, नगरसेवक भास्कर पा. पवार, नगरपालिका गटनेते पंचशील कांबळे, नगरसेवक बबन निर्मले,पत्रकार साहेबराव सोनकांबळे, मोहन पवार, ज्ञानोबा नागरगोजे,केशव पवार, प्रदीप कुमार कांबळे, युनूस शेख,संजय कहाळेकर, अशोक सोनकांबळे,शिवराज पवार,आदी मिञ मंडळीनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या