बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेनेच्या दोन्ही गटांनी केली साजरी !

[ कुंडलवाडी  – अमरनाथ कांबळे ]
           हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटाने नगरपालिकेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी केली आहे तर शिवसेना ठाकरे गटांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णाला फळ वाटप, संत गोरोबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, बिलोली येथे राजीव गांधी निवासी मतिमंद विद्यालय व गंगामाता मूकबधिर विद्यालय येथील विद्यार्थ्यांना खाऊव फळ वाटप आदी उपक्रमांनी जयंती साजरी केली आहे.
         यावेळी ठाकरे गटाचे शहराध्यक्ष शंकर कोणेरवार, उपाध्यक्ष रमेश गवते, युवा शहराध्यक्ष बंटी साठे, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल हेमके, नरेश साठे, शहर संघटक दिगंबर लाडे,शाखाप्रमुख सुहास श्रीरामे, किशोर पाशावार, विलास नरहरे,सचिन कपाळे आदीसह शिंदे गटाचे शहर प्रमुख लक्ष्मण गंगोणे, युवासेना शहर प्रमुख गंगाधर शिंदे, युवासेना उपाध्यक्ष चंद्रशेखर भोरे,संघटक व्यंकट श्रीरामे, उपशहर प्रमुख कृष्णा काळेवार,शेख इस्माईल, संतोष कंपाळे, अण्णाराव पाटील, दत्तू वारेवार,ओबीसी शहर प्रमुख सुरेश राजेरवाड, वैद्यकीय आघाडी सल्लागार बालाजी हमंद,आदीसह मोठ्या प्रमाणात दोन्ही शिवसेना गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या