डॉ मीनलताई खतगावकर यांच्या प्रचारार्थ प्र बाळासाहेब थोरात यांची सभा संपन्न !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व 89- नायगांव विधानसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मा.मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा मांजरम, ता.नायगाव येथे पार पडली.या सभेला संबोधित करताना प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण आणि डॉ.मीनल पाटील खतगावकर यांचे EVM मशीन वर अनुक्रमांक एक आहे तरी दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.
याप्रसंगी यशपाल भिंगे, श्रीनिवास पाटील चव्हाण, शमीम अब्दुला, केदार पाटील साळुंखे, डॉ. श्रावण रॅपनवाड, जाकेर चाऊस, सतीश देशमुख, संजय आप्पा बेळगे,संजय पाटील शेळगावकर, संभाजी पाटील भिलवंडे, रवींद्र भिलवंडे, डॉ.रेखाताई चव्हाण, शिवराज पाटील शिंदे, मारोतराव ढोसनीकर, बालाजी पाटील रातोळीकर यांच्या सहप्रमुख कार्यकर्ते व मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या