लोकनेते कै बळवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने कार्यक्रम

(नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी)
नायगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते ज्येष्ठ लोकनेते माजी आमदार कै बळवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
                        नायगाव मतदार संघाचे भाग्यविधाते ज्येष्ठ लोकनेते माजी आमदार कै बळवंतरावजी चव्हाण यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दिनांक ७ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ९:३० वाजता नायगाव येथील जुन्या गावातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या समाधीस्थळी विधिवत पुष्पांजली कार्यक्रम आयोजित केला .
या पुष्पांजली कार्यक्रमासाठी नायगाव मतदार संघातील आप्त , स्वकीय, नातेवाईक ,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आव्हान कै बळवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या