बळीराजा पार्टी उमरगा तालुका उमरगा यांच्या वतीने एस. टी. कर्मच्याऱ्यांच्या आंदोलनाला जाहिर पाठींबा !
[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा अंगद कांबळे ]
बहुजन हिताय सुखाय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस. टी. ची सध्या स्थितीत का वाट चुकत चालली आहे याचा विचार गांभीर्याने विचार करण्याची वेळ शासन, प्रशासन राज्यकर्ते, सामाजिक संघठना आणि सामन्य जनतेवर आली आहे एस. टी. चे चाके अजुन रुतुन बसली आहे प्रवाशांचे हाल होत आहेत प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
त्या मुळे अनेक संघठनाणि, राजकीय पक्ष्यानी , या संपला जाहिर पाठिंबा दर्शवलेला आहे उमरगा येथील एस. टी. संपा.मध्ये सामिल असलेल्या कर्मच्याऱ्यांच्या कुटुंबाला बळीराजा पार्टी उमरगा तालुका उमरगा यांच्या वतीने राशेन देण्याची हमी बळीराजा पार्टी महाराष्ट्र राज्य वतीने घेण्यात आली आहे.आणि या संपला बळीराजा पार्टी उमरगा तालुका उमरगा यांच्या वतीने जाहिर पाठिंबा दिलेला आहे या वेळी तालुका अध्यक्ष इंद्रजीत सूर्यवंशी ता. सचिव कृष्णा हिरळे, राजेंद्र गायकवाड़, महादेव पाटिल दलित महासंघाचे राजेंद्र शिंदे, युवक अध्यक्ष दत्तू लवटे हे उपस्थित होते.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा.