बल्लूर येथील युवकाच्या खुणातील मुख्य आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला !

( मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क )
देगलूर तालुक्यातील बल्लुर येथील युवक योगेश धर्माजे खूण प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने जामीन अर्ज माघार घेण्यात आला.
मार्च 2021 रोजी, ग्रामपंचायतीच्या निवणुकीच्या कारणावरून युवकाचा खून करण्यात आला होता, सदरील प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यात मुख्य आरोपीचा जामीन अर्ज बीलोली सत्र न्यायालयाने नाकारल्याने त्या विरुद्ध उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
सदरील प्रकरण सुनावणीस आले असता मा. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत सदरील अरोपीची जमीन देण्यास नकार दिल्याने आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज माघार घेतला.
या वेळी फिर्यादीच्या वतीने ॲड. अविनाश सूर्यवंशी कावळगावकर यांनी बाजू मांडली.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या