कर्मयोगी कै. बळवंतरावजी अमृतराव चव्हाण यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने कार्यक्रम !

नायगाव तालुक्याचे भाग्यविधाते कै.बळवंतरावजी अमृतराव चव्हाण यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.श्रद्धेय, पंचक्रोशीतील भाग्यविधाते, पित्रतुल्य व्यक्तिमत्व कै. बळवंतरावजी अमृतराव चव्हाण यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दि ७ ऑगस्ट, रविवार रोजी, सकाळी ९,३० वा नायगाव येथील जुन्या हनुमान मंदिराजवळ असलेल्या समाधी स्थळाची विधिवत पूजा अर्चा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चव्हाण परिवार आप्तस्वकीय यांच्या हस्ते पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे.या प्रसंगी बळवंतरावजी चव्हाण अण्णा यांना अभिवादन करण्यासाठी स्नेही जणांनी उपस्थित राहावे असे आवाहन कै. बळवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नायगाव बाजार जि नांदेड च्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

  • आण्णा एक राजकीय योद्धा !!
  • [[ लेख ]]
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये समाजसेवा उद्योगाकार अशा विविध क्षेत्रात एक नेतृत्वाची फळी उदयास अंगी असलेल्या असीम, असामान्य गुणांनी जनसामान्यांना प्रभावित केलं त्यापैकीच एक ग्रामीण नेतृत्व म्हणून पाटील चव्हाण पाहिल्या जातं आज त्यांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
खरंतर असामान्य माणसे ही सामान्य माणसाप्रमाणेच जन्माला येत परंतु पुढे संपूर्ण आयुष्य तुम्ही कशा प्रकारे केलं त्यावर तुमची सामान्यता किंवा असामान्यता अवलंबून असते. जीवनात सर्वकाही सहज मिळत नाही. सोन्याला सुद्धा सुंदर दागिना बनण्यापूर्वी आगीचा ताप हर सहन करावा लागतो अगदी त्याचप्रमाणे राव पाटील उर्फ अण्णा यांचे जीवनातून असामान्य बनत गेले. स्वतःच्या अंगी असलेल्या नैसर्गिक असिम बुद्धीचातुर्य, मिताप्रमाणे सात्विक व्यक्तिमत्वाबरोबरच प्रचंड आत्मविशारणांचे व्यक्तिमत्व एखाद्या अन्य मराठवाड्याच्या राजकीय आसमंतात उठून दिसते.
ग्रामीण नायगाव ते नायगाव तालुका निर्मितीच्या जडणघडणीत अण्णांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणण्यापेक्षा एकंदरीत अण्णा आणि नायगाव आणि नायगाव आणि अण्णा असे समीकरणच त्याकाळी बनले होते. यामागे अण्णांच्या अंगी असलेली निर्भीड आणि निर्णायक बुद्धी क्षमता होय. स्वतःच्या अंगी असलेला प्रचंड आत्मविश्वास सकारात्मक बुद्धी आणि उत्साह या तीन गोष्टीची सांगड घालून अण्णांनी नायगाव, बिलोली देगलूर तसेच आसपासच्या परिसरात राजकीय, सामाजिक धार्मिक सहकार त्याचबरोबर शैक्षणिक कामे सहजरित्या हाताळा केवळ वर्तमान परिस्थितीत आपली जी पणाला लावून कुठल्याही परिणामाची चिंता न करता अनेक विकट परिस्थितीचा सामना कुठलीही पळवाट शोधता एखाद्या निर्भिड याप्रमाणे त्यांनी केला.
ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून ते विधानसभा सदस्यापर्यंत विविध पदे भूषवत जनमानसात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. यशवंतराव चव्हाण यांना आपला राजकीय गुरु मानून ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा अण्णांनी समर्थपणे पेलली म्हणूनच त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकीदींचा प्रभाव आजही तितक्याच सन्मानाने आणि आदर्शने जनसामान्यात पर्चिला जातो. एखादी व्यक्ती स्वतःच्या अंगी असलेल्या असामान्य गुणांमुळे लोकांच्या नजरेत आदर्श बनू शकते त्याचे आदर्श उदाहरण म्हणजेच अण्णांचे व्यक्तिमत्व होय माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत चारित्वाचा फार मोठा हिस्सा असतो अण्णांच्या निष्कलंक आणि शुद्ध चारित्र्यामुळेही लोक त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहतात.
अण्णांच्या अमृत रसवाणीचा प्रभाव त्यांच्या विरोधकांवर सुद्धा पडत असे राजकारण म्हटलं की विरोध हा आलाच परंतु हा विरोध केवळ पक्षा पुरताच मर्यादित असायचा. पण अण्णांच्या विचारांचा आदर त्यांचे विरोधक
करत असत. राजकारणात विरोधकांकडून विरोध होत नाही असं नसतं, राजकारण म्हटलं की सामाजिक कटाक्ष आणि विरोध हा आलाप सामाजिक कटाक्षाला किंवा विरोधाला तात्काळ उत्तर न देता मिळालेल्या कटाक्षात आणि विरोधाच्या ज्वालेत आपले कार्य अधिक प्रेरक आणि ऊर्जावान बनवून जीवनयागात एखाद्या योध्याप्रमाणे अण्णा लढत राहिले.
त्यांच्या निर्णायक बुद्धीचे अनेक उदाहरण देता येतात. 1970 च्या दशकात समाजात जाती धर्माचे स्तोम माजले असताना अस्पृश्यांच्या पंक्तीत बसून स्वतःच्याच मुलीच्या लग्नात त्यांनी जेवण घेतले आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. त्याचबरोबर अस्पृश्यांसाठी गावातील मारुतीचे मंदिर दर्शनासाठी खुले करून दिले. त्यांच्या निर्भीडपणाचे आणखी एक उदाहरण म्हणजेच 1983 ला संपूर्ण नांदेड जिल्हयात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि पूरयस्त, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी कामगार, सर्वसामान्य माणूस यांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले तेव्हा या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष खेचण्यासाठी त्यांनी पुरस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा सरकारला दिला अण्णांच्या या निर्भीड वृत्तीमुळे सरकारला या गोष्टीची दखलही घ्यावीच लागली.
राजकारणात हार जीत ही आलीच परंतु कोणत्याही परिस्थितीत मनाचा संयम न ढळू देता, आपल्या कार्याची योजकता आसूण सोक मनाचा कौल घेत नव्या उमेदीने भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करणान्या या राजकीय योद्राच्या व्यक्तिमत्वाकडून आजच्या राजकारणाला पड़ा पैसा येतो. म्हणजेच लोक केवळ सत्तेसाठी राजकारण करतात त्यांच्यासाठी पक्षश्रेष्ठी पक्ष, समाजहित या गोष्टी गौण असतात कारण राजकीय परतीवर स्वतः चा संयम ढळू न देता अण्णांनी पक्षश्रेष्ठीसाठी पक्षासाठी विचार संघटनेसाठी, त्याचबरोबर समाजहितासाठी आपल्या मनाचे औदार्य वेळोवेळी दाखवून आदर्श राजकारणाचा पायंडा घालून दिला.
आज राजकारणाची वाईट परिस्थिती पाहता सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण राजकारणाकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही. परंतु अण्णा तसेच त्यांचे समकालीन राजकारणी यांच्या आदशीचा उहापोह होणे काळाची गरज आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. राजकारणात उदयास येणाऱ्या नवीन तरुण पिढीने जर अण्णा व त्यांच्या समकालीन नेतृत्वांच्या आदर्शचा एक पाठ अंगीकारला तर भारतीय राजकारणाचं भविष्य है उज्वल झाल्यावाचून राहणार नाही. पुनश्च एकदा अशा राजकीय महान योद्वारा कोटी कोटी प्रणाम…….
// प्रा. राजेश्वरी रमेशराव कदम // 

ताज्या बातम्या