लोकनेते कै.बळवंतरावजी चव्हाण यांना मान्यवरांकडून आदरांजली !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
लोकनेते कै. बळवंतराव चव्हाण यांच्या 15 व्या पुण्यस्मरणार्थ काल रविवारी सकाळी पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चव्हाण परिवारासह अनेक मान्यवरांनी समाधी स्थळे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
लोकनेते तथा माजी आमदार बळवंतरावजी (अण्णा) चव्हाण यांच्या निधनाला काल पंधरा वर्षे झाली. आण्णा च्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम घेतले जातात. सकाळी ठीक 9.30 वाजता हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या अण्णाच्या समाधीस्थळी पुष्पांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी चव्हाण परिवारातील केशवराव पाटील चव्हाण, मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण, हनमंतराव पाटील चव्हाण, आनंदराव पा.चव्हाण, सुधाकर पाटील चव्हाण, श्रीनिवास पा.चव्हाण, धनंजय पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण, डॉ.विश्वास पाटील चव्हाण, डॉ.अमरजीत पाटील चव्हाण, प्रा.रवींद्र पाटील चव्हाण, पंकज पाटील चव्हाण, गजानन पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील चव्हाण, नटू पाटील चव्हाण, विराज पा.चव्हाण यांनी अण्णाच्या समाधीचे विधिवत पूजन केल्यानंतर मान्यवरांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी दत्ताहरी पाटील चोळाखेकर (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद ), बळवंतराव पाटील बेटमोगरेकर( मा. जिल्हा परिषद सदस्य ) ,संजय आप्पा बेळगे (माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड), प्रल्हाद पाटील इज्जतगावकर (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी उमरी), संभाजी पाटील भिलवंडे ( तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नायगाव), शिवाजी पाटील पाचपिपळीकर (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी बिलोली), शिवाजी पाटील बेटमोगरेकर, पंडित पाटील कल्याण खैरगावकर, बंसिधर पाटील फासगे, माधव आप्पाजी बेळगे (माजी जिल्हा परिषद सदस्य), संजय पाटील शेळगावकर (उपसभापती प.स.नायगाव), आनंदराव पाटील मोरे, प्रा.बी आर कदम सर (मा.अध्यक्ष जुक्त संघटना नांदेड), मा.प्राचार्य गिविंद मेथे सर, बालाजीराव मदेवाड साहेब, भानुदास पाटील सोमठाणकर, प्रा.मनोहर पवार, बालाजी पाटील कारेगावकर, बापूसाहेब पाटील कौडगावकर, दिगंबर पाटील सावंत, बालाजी ढगे इज्जतगावकर, गजानन पाटील हासेकर, फुलाजी पाटील शिंदे हरेगावकर, शरद रमेश पा.शिंदे, भालेराव, संजय चव्हाण, पांडू चव्हाण, माणिक चव्हाण, विठ्ठल बेळगे, साईनाथ चन्नावार , शंकर चव्हाण, नवनाथ जाधव,
नायगाव नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष नगरसेवक कर्मचारी बांधव उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या