बळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ बी. फार्मसी नायगांव बा. येथे विद्यार्थ्यासाठी मेडीकल कोडींग कार्यशाळा संपन्न !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
बळवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ बी. फार्मसी नायगांव बा. येथे “WORLD PHARMACY DAY” निमित्त करिअर गाईडन्स प्रोग्राम घेण्यात आला. त्या मध्ये विद्यार्थ्यांना JOB PLACEMENT बाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी साई मेडीकल कोंडींग चे ट्रेनर श्री. पंकज मोरे सर व Ass. Manager WNS Goble Service Ltd. Mr. Anirudh Lande सर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडीकल कोडींग बदल कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना मेडीकल कोडींग या क्षेत्रात करिअरची मोठी संधी आहे व नौकरीची संधी जास्त प्रमाणामध्ये आहे. हे विद्यार्थ्यांना कार्यशाळाच्या माध्यमातुन सांगण्यात आले आहे. व विद्यार्थ्यांना नौकरीची संधी मिळण्यासाठी कोणते कौशल्ये लागतील या बद्दल कार्यशाळा घेण्यात आली आहे. या कार्यशाळा मार्फत मेडीकल कोडींग चे सखोल मार्गदर्शन व नौकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या कार्यशाळासाठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक श्री. पंकज मोरे सर व श्री अनिरुध लांडे सर तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. आ. वसंतरावजी बळवंतरावजी पा. चव्हाण साहेब व संस्थेचे सचिव मा. श्री. रविंद्र वसंतरावजी पा. चव्हाण साहेब व बळवंतरव चव्हाण कॉलेज ऑफ बी. फार्मसी नायगांव बा. चे डायरेक्टर मा. श्री. विशाल वसंतराव क्षिरसागर व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या