कुंडलवाडी बँक ऑफ बडोदा चे शाखाधिकारी डी.एम.शेंगुळे यांची परभणी येथे बदली !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
      येथील बँक ऑफ बडोद्याची शाखा अधिकारी डी.एम. शेंगुळे यांची परभणी येथे विनंती अर्जावरून बदली करण्यात आली असून ते कुंडलवाडी शाखेतून दि.२५ जून रोजी कार्यमुक्त झाले आहेत. त्यांच्या जागी हैद्राबाद येथील किरणकुमार यांची कुंडलवाडी येथील शाखेत बदली करण्यात आली आहे.शाखाधिकारी डी.एम. शेंगुळे दीड वर्षांपूर्वी येथील शाखेत रुजू झाले होते त्यांच्या कार्यकाळात सन २०१९-२० मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कुंडलवाडी येथील बँक ऑफ बडोदा च्या ५३६ शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ चार वर्षापासून रखडले होते यासाठी शाखाधिकारी शेंगोळे यांनी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या