बन्नाळीत स्मशानभूमित  वृक्षारोपन !

(धर्माबाद तालुका प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)
तालुक्यातील बन्नाळी येथील ग्राम पंचायतीच्या वृत्तीने स्मशान भूमित , अंगनवाडीच्या शेजारी वृक्षारोपन करण्यांत आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाची गरज आहे.
तसेच प्रदूषण टाळण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करणे काळाची गरज आहे. झाडामुळे वातावरणात ऑक्सीजनची पातळी वाढते तसेच परिसर ही सुशोभित होतो.
आज दुष्काळसदृश्य परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. वृक्षाची संख्या कमी होत आहे याकरीता निसर्गाची जोपासणा व्हावी म्हणून बेल, कडूलिंब, पिपळ, वड, चिंच, सागवान, उमर,जाभूळ, गुलमोर, आबा बोर, वृक्षलागवड करण्यांत आली. झाडे लावा झाडे जगवा या योजने अंतर्गत स्मशान भूमित वृक्षाची लागवड केली . यावेळी बन्नाळीचे जेष्ठ नागरीक नागनाथ पाटील, महाबळेश्वर पाटील, मारोती बुनोड , दत्तात्रय काळे, सुभाष पाटील तंटा मुक्ती अध्यक्ष, सौ. सुरेखा लक्ष्मण निदानकर, (सरंपच ) उपसरपंच साईनाथ चपळे, ग्रामपंचयत सदस्य नविनकुमार पाटील, पुंडलिक पाटील, साईनाथ कर्रे, विनायक मंडगे, साईनाथ चपळे, लक्ष्मण निदानकर, ग्रामसेवकर देविदास खंडागळे, तलाठी दयाकर रेड्डी, सर्वस्त गांवकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या