अपत्तीग्रस्त कुटुबांना बापुसाहेब पा.कौडगावकरांनी आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासली !

उमरी –

उमरी तालुका काँग्रेस युवा तालुकाध्यक्ष बापुसाहेब पा. कौडगावकरांनी आपल्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जोपासत उमरी तालुक्यातील हातणी , जिरोना ,बितनाळ या तीन गावातील अप्पतीग्रस्त कुटुंबाना भेट देऊन प्रत्येकी कुटुंबाच्या वारसांना ११ हजार रुपयाची मदत करुन मदतीचा हात दिल्याने बापुसाहेब पा.कौडगावकरांचे उमरी शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे .
उमरी तालुक्यातील हातनी येथे कोंडीबा गंगाराम पांचाळ यांचा हदय विकाराने निधन झाले होते त्यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, असा परिवार असुन त्या परिवारातील चार ही मुलं अपंग आहेत त्या कुटूंबाचा उत्पन्नाचा स्रोत नसल्याने त्या निराधार कुटुबांना बापुसाहेब पा.कौडगावकर यांनी भेट देऊन ११, हजार रु. ची आर्थिक मदत करुन आधार दिला .
यावेळी कौडगावचे सरपंच भुजंग धसाडे, हातनीचे सरपंच गंगाधर पवार , उपसरपंच दताहरी पाटील पवार परमेश्वर पवार, अनसाजी पवार, मारोती पा.पवार,व अन्य ग्रामस्त उपस्थित होते.
तर जिरोना येथे विहीरीत पाय घसरुन आई सुनंदा चुनुकवाड,व मुलगी कविता चुनुकवाड या मायलेकीचा मृत्यू झाला होता त्यांची आर्थिक परिस्थिती पाहुण यांना ही साहेबराव चुनुकवाड यांना ११ हजार रु देऊन आर्थिक सहाय्य केले यावेळी जिरोणा येथिल सरपंच प्रतिनिधी डी. जी. तुपसाखरे , साहेबराव चुनुकवाड उपस्थित होते .त्याच बरोबर तालुक्यातील बितनाळ गावात सर्पदंशाने तीन वर्षाचा बालक गणेश गंगाधर मुक्केवाड या बालकाचा मृत्यू झाला होता .त्या कुटुंबात दुसरे कोणतेच अपत्य नसल्याने बापुसाहेब पा. कौडगावकरांनी बितनाळ येथे त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन करुन ११ हजार रु.ची मदत करून आर्थिक सहाय्य केले
यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष लिंगराम पा.कवळे, सेवानिवृत्त बँक मँनेजर सुदाम पलेवाड, विठ्ठल पाटील.येताळे, बाबूराव पा.कदम आदी उपस्थित होते

ताज्या बातम्या