शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक शहरी भागात जोडल्या जावा शेतकरी सुखी समाधानी झाला पाहिजे म्हणून रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही भ्रष्ट अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने रस्त्याचे तीन तेरा झाले असून रस्त्याची चौकशी शासनाच्या गुण नियंत्रण विभागाच्या अंतर्गत करून संबंधित अधिकारी व गुत्तेदारावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. बरबडा सर्कल अंतर्गत असलेल्या गोदमगाव ते अंबोली , हिप्परगा ( जाने ) कुषणूर , बरबडा , टाकळी या २२ कि .मी . च्या रस्त्याच्या सुधारण्यासाठी कै . माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंजूर असलेल्या या रस्त्यासाठी तब्बल १० कोटी ४६ लक्ष निधीही मिळाले आहे. काम नांदेड येथील गुरू रामदास कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. हे काम ११ संटेबर २०१७ रोजी शुभारंभ झाले आहे.
परिसरातील व तिन तालुक्यातील नागरिकांना अगदी सोयीचा पडावा म्हणून करतात आलेल्या बरबडा मार्ग रस्त्याच्या डांबरीकरण व कच्चा काम अवघ्या सहा महिन्याच्या आत जागोजागी उखडून जाऊन रस्तात खड्डे पडले आहेत.
तब्बल चार पाच वर्षानंतर झालेले हे काम अवघ्या काही दिवसांवर उखडून गेल्याने या मार्गावरील नागरिकांना तीव्र संताप व्यक्त केला असून या रस्त्याची गुणनियंत्रण पथकामार्फत चैकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
बरबडा व सर्कल अंतर्गत असलेल्या आदी गावांना जाण्यासाठी सुध्दा हाच एकमेव प्रमुख मार्ग आहे ग या रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरणचे काम झाले होते.
दरम्यानच्या काळात या रस्त्यावर गुडघ्य ऐवढे खोल खड्डे पडून रस्ता जागोजागी खरब झाले आहे. परिणामी या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्या मुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरी जावे लागत आहे असलेल्या गैरसोयीला कंटाळून या भागातील नागरिकांनी या रस्त्याच्या पुनर्बाधणीची मागणी केली या रस्त्याच्या साहा महिन्याच्या आसपास रस्त्याचे काम अतिशय थातूरमातूर पद्धतीने आटोपणयात आल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत नांदेड येथील एका प्रतिष्ठित गुतेदार सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना व मुख्यमंत्री ग्रामसडक हाताशी धरून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे या भागातील नागरिकांचे बोलले जात आहे. खड्डे बुजवून काम करण्यात यावे अशी मागणी बरबडा व परिसरातील नागरिकांनी केली आहे
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy