नाभिक एकता महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी श्री बॉलिस्टर गणपती राचुटकर यांची निवड !

[ कुंटूर सर्कल प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील मौजे सालेगाव चे भूमिपुत्र श्री.बॉलिस्टर गणपती राचुटकर हे नांदेड येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या कार्यालयात कार्यरत आहेत.
त्यांची नुकतीच नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भगवानराव अण्णासाहेब बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री बॉलिस्टर गणपती राचुटकर यांची नाभिक एकता महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे व सचिव पदी दिगंबर रोहिदासराव श्रीमंगले यांची निवड आणि महिला शहराध्यक्षपदी सौ सुरेखा बॉलिस्टर राचुटकर यांची निवड व शहर उपाध्यक्षपदी सौ. सविता दिगंबराव श्रीमंगले यांची निवड झाली आहे.
 यांच्या निवडीने सर्व नांदेड जिल्ह्यातील नाभिक समाजामध्ये नव चैतन्य निर्माण झालेले आहे. श्री बॉलिस्टर गणपती राचुटकर मित्र परिवाराला नेहमी अडीअडचणीला मदत करणारे प्रत्येक मित्रपरिवार व समाजाच्या कामांमध्ये जनसामान्य गोरगरीबाना च्या अडीअडचणीना धावून जाणारे म्हणून परिचित आहेत त्यांच्या निवडीने नायगाव तालुक्यासह जिल्ह्यातून मित्र परिवाराकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
Www.massmaharashtra.com 

 

ताज्या बातम्या