बार्टिच्या विविध शिष्यवृतीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी भविष्य घडवावे – समतादुत दिलीप सोंडारे !

[ प्रतिनिधी – गौतम वाघमारे ]
 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था डॅा.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे च्या वतीने मागास्वर्गीय विद्यार्थी यांच्या साठी असलेल्या विविध शिष्यवृती योजनांचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे असे आवाहन नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी केले.

दि.10 फेब्रूवारी रोजी पंचवटी हायस्कूल राहेर येथे बार्टिच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान यावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक एम.आर.मोरे होते.

 

यावेळी सामाजिक न्याय विभाग आणि बार्टिच्या विविध योजना सांगण्यात आल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या