समाज बदलण्यासाठी कायद्याचा फायदा घेणे आवश्यक, न्यायाधीश आर.एम.लोळगे !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
 समाजात अनेक प्रकारची विकोपाला गेलेले कौटुंबिक व अन्य वाद आहेत म्हणून समाजात आज जे स्वतंत्र्यानंतरही बदल दिसत नाही, कारण समाज एकाएकी बदलत नसतो तर समाजात अमुलाग्र बदल होण्यासाठी कायद्याचा फायदा घेणे आवश्यक असल्याचे मत नायगाव दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम लोळगे यांनी आयोजित शिबिरात व्यक्त केले.
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे देश स्वतंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सव या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेल्या वेळी विचार पिठावर अध्यक्षस्थानी नायगाव दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम. लोळगे तर पंचायत समिती विस्तार अधिकारी लतीफ शेख, अँड सुलभा भोसले, अँड बी.एम. वाघमारे, अँड सय्यद जावेद, अँड सौ कोकणे मॅडम, अँड. एकलारे, पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधीक्षक डॉ. साळवे, माजी प्राचार्य ह.सं.खंडगावकर,सौ. लोखंडे मॅडम, अँड. कवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सदर शिबिरात उपस्थित मान्यवराचे स्वागत आयोजक संजय पाटील चोंडे, सरपंच जळबा वाघमारे व ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले असून प्रस्तावनेत अँड.सुलभा भोसले आपले मत व्यक्त केले, तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुदखेडकर यांनी हृदयरोग, किडनी आजार, अपघात व विविध आजारावर रुग्णांनी आयुष्यमान भारत कार्डावर शासकीय व नांदेड येथील संजीवनी ,आधार, ग्लोबल, येशोसाई या खाजगी दवाखान्यात मोफत उपचार करून घेण्यासाठी मार्गदर्शनपर सल्ला दिले आहेत. शेतकऱ्यांना लंम्पी या रोगापासून आपल्या पाळीव जनावरांना मोफत लसीकरण करून घेण्यासाठी व नव्याने सुरू झालेल्या सुंदर माझा गोठा या योजनेचा फायदा घेण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. अँड. सय्यद जावेद यांनी भारतीय राज्यघटने विषयी तर अँड. बी एम वाघमारे यांनी महिला सबनीकरणाविषयी आणि अँड. एल एस तुमेदवार शिक्षण व त्यांचे अधिकार याविषयी उपस्थित ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन करून एक नवी दिशा दिली आहे. यावेळी वतने, भाग मोरे, कवी ज्ञानेश्वर शिंदे, चेअरमन माधव शहापुरे, व्हाईस चेअरमन माधवराव सालेगाये, उपसरपंच बालाजी सालेगाये, संजय पा.अनेराये, संजय माली पाटील, ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पा.आनेराये, दतराम बैलकवाड, यादवराव पाटील पेदे, माजी सैनिक गंगाधर शहापुरे, प्रकाश बैलकवाड, ग्रामसेवक येरसनवाड,सौ. रुक्‍मीनबाई अनेराये,सौ. गंगाबाई निलावार, अंगणवाडी शिक्षिका कुशवर्ता शहापुरे,सौ. पांडे मॅडम, माधव ऐंजेपवाड, गौतम वाघमारे,एम.के.बैलकवाड यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अँड. जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार तंटामुक्ती अध्यक्ष तथा पत्रकार माधव बैलकवाड यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या