5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी श्रीवर्धनच्या पवित्र भूमीत आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर इंडिया यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आमदार मा.आदितीताई तटकरे व आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संजय पवार, प्रा.महंमद शेख व अन्य मान्यवरांचे हस्ते रायगड जिल्हा परिषद शाळा मेंदडी येथे कार्यरत शिक्षक श्री.अब्बास रतन शेख यांना प्रदान करण्यात आला.
श्री शेख यांनी आपल्या सेवेची सुरुवात कांदळवाडा येथून केली आणि आज मेंदडी येथे कार्यरत आहेत. ते शाळा सिद्धी राज्य निर्धारक म्हणून यशस्वी कार्य गेली 5 वर्षे करत आहेत असून म्हसळा तालुका शाळा सिद्धी उपक्रमात अग्रगण्य ठेवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.त्यांनी कांदळवाडा आणि मेंदडी येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात पारंगत करण्याचे काम केले आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
तंत्रस्नेही शिक्षक म्हणून अनेक ऑनलाईन कामे करत आहेत. त्यांनी शैक्षणिक काम करत असतानाच BLO चे काम उत्कृष्टपणे करत आहेत याची दखल घेत मा.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील उत्कृष्ट BLO म्हणून पुरस्कार देण्यात आला.
त्याच बरोबर कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून देखील उत्तम काम केले आहे.तसेच केंद्र आणि तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धा ,विज्ञान प्रदर्शन ,विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात.या सर्व बाबींचा विचार करून त्यांना आविष्कार फाउंडेशनचे वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अब्बास शेख यांना पुरस्कार मिळाले बद्दल गटशिक्षणाधिकारी मा श्री संतोष दौंड, केंद्र प्रमुख श्री किशोर मोहिते, मेंदडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री जमीरभाई नजीरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मोरेश्वर पाटील, उपाध्यक्ष श्री अरविंद पाटील, सर्व सदस्य,पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षकवृंद, अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सोपान चांदे, उपाध्यक्ष सौ गीतांजली भाटकर, कैलास कळस, तालुका अध्यक्ष सौ शुभदा दातार, सरचिटणीस रमेश जाधव, उपाध्यक्ष श्री विजय घाटगे, दिनेश पाटील, संगिता आंबेडकर, संगिता निरणे,पनिता गावित यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
पुरस्कार वितरण समारंभास नाट्यकलाकार मा श्री रविंद्र चौधरी, सुशिल कदम, म्हसळा टाईम्स चे उपाध्यक्ष NES म्हसळा येथे कार्यरत प्रा.महंमद शेख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परीषदेचे अध्यक्ष श्री राजेश सुर्वे, संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संदीप नागे, जिल्हा अध्यक्ष श्री शंकर शिंदे, अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री किशोर मोहिते व अन्य मान्यवर उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy