साहित्य, सामाजिक व राजकीय चळवळीचे मोठे नुकसानः अशोकराव चव्हाण ।

भगवानराव भिलवंडे यांना पालकमंत्र्यांची श्रद्धांजली !
[ नांदेड, दि. १६ नोव्हेंबर २०२१: आनंद सुर्यवंशी ]
भगवानराव भिलवंडे यांच्या निधनाने साहित्य, सामाजिक व राजकीय चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
भिलवंडे यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ते शंकरराव चव्हाण साहेबांचे जवळचे सहकारी होते. तेव्हापासून आमचा ऋणानुबंध होता. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी लाभली होती. एक सृजनशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती. गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले होते. काही काळ या कारखान्याचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवले होते. राजकीय क्षेत्रात काम करताना साहित्यातील त्यांची अभिरूची कधीच कमी झाली नाही. त्यांचे कार्य व आठवणी नेहमी स्मरणात राहतील, या शब्दांत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
 www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या