कुंडलवाडीत राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जयंती उत्साहात साजरी.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
शहरातील विठ्ठलेश्वर मंदिर,वंजारगल्ली येथे राष्ट्रसंत भगवानबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंत भगवानबाबांनी अध्यात्मातून समाज जागृत करण्याचं काम केले.आपल्या कीर्तनातून ते जातिभेद,धर्मभेद,अज्ञान, अंधश्रध्दा,अनिष्ट रूढी- परंपरा यावर त्यांनी प्रहार केला. समाजामध्ये शिक्षणाचे महत्व रुजवण्याच काम त्यांनी केले.समता,बंधुता,एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा प्रचार त्यांनी केले असे विचार शिवकुमार गंगोने यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.तसेच सयाराम भोरे,गंगाप्रसाद गंगोने,भीम पोतनकर,जनार्दन करपे,रमेश करपे आणि कैलास माहेवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र भोरे यांनी केले.
भगवानबाबा यांची जयंती साजरी करण्यासाठी संतोष खांडरे,संजय हामंद,किरण हामंद, शंकर कानकाटे, दत्ता हामंद, जगदीश हामंद, संजय भास्कर, राजु हमंद,शिवकुमार खांडरे,राजू माहेवार, संजय दुप्तले,रुपेश साठे,विठ्ठल हेमके,रुकमाजी करपे,दत्ता कापकर, रामनाथ करपे,चंद्रशेखर भोरे, साईनाथ माहेवार,प्रफुल खांडरे आदी वंजारी समाज बांधव उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या