नायगाव येथे श्रीमद् भागवत कथा सोहळा थाटात संपन्न !

[ नायगांव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
           श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्या निमित्त श्रीमद भागवथ कथा ज्ञानयज्ञ हभप गुरूवर्य चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांच्या आशिर्वादाने श्रीमद् भागवत कथा सोहळा दि 4 फेब्रुवारी10 पासून सुरूवात थाटात संपन्न झाली.
          नायगांव शहरातील जुन्या गावातील हनुमान मंदीर येथे श्री निवृतीनाथ महाराज समाधी सोहळ्या निमित्त समस्त गावकऱ्यांच्या वतीने हभप चंद्रशेखर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळयाचे ४ ते १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे.

           या भागवत कथे मध्ये रोज दैनंदिन पुजापाट, मुख्य देवस्थापन, पारायण, भागवथ कथा, सकाळी ४ ते ६ काकडा, दुपारी ३ ते ६ भागवथ कथा कथा प्रवक्ते हभप अनिरुद्ध यशवंत महाराज यांच्या मंत्रमुग्ध मधुर वाणीतून संगीतमय वातावरणात सहा दिवस भाविका भक्तांना ऐकावयास मिळाली श्रीमद् भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती या कथेत विष्णुसहस्त्रनाम तुळशी अर्चना, भक्त प्रल्हादकथा , श्रीकृष्ण जन्मकथा, श्रीकृष्ण विवाह सोहळा,आदी विविध कथेचे झाकी दाखण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चव्हाण परिवारासह भगवानराव पाटील कल्याण, श्रीनिवास जवादवार, राम सावकार मद्रेवार, दशरथ बच्चेवार, प्रदीप देमेवार, मारोती कत्तूरवार, या सर्व परिवाराच्या वतीने आथक परिश्रम घेऊन श्रीमद् भागवत कथा सोहळा थाटात संपन्न केला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या