नरसी बालाजी मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची सुरुवात !!

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सुरुवात भागवत कथाकार परमपूज्य श्री ब्रह्म शंकर शास्त्रीजी महाराज श्रीधर वृंदावन यांच्या मधुर वाणीतून दिनांक 28 सोमवार ते 5 डिसेंबर सोमवार चालू झाली आहे.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती प्रतिस्वरूप समजले जाणाऱ्या भगवान बालाजी मंदिर नरसी येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानू सोहळ्याचे सुरुवात दिनांक 28 नोव्हेंबर सोमवार ते 5 डिसेंबर 2022 सोमवार पर्यंत दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भागवत कथाकार परमपूज्य श्री ब्रह्मशंकर शास्त्री जी महाराज श्री वृंदावन यांच्या मधुर वाणीतून सुरुवात झाली असून या कथेचे आयोजक मेडेवार परिवाराच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती विश्वस्त श्रीराम उद्धवराव मेडेवार यांच्या हस्ते विधिवत्त पूजा दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सोमवारी करण्यात आली श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या