श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन ; सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थानचा उपक्रम !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथील श्री सदगुरु नराशाम महाराज  मठ संस्थांनच्या वतीने श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि.07 एप्रिल 2023 ते दि.16 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये होणार आहे.
भागवत कथा सप्ताह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.  ज्या भाविक भक्तांना या सोहळ्यात सहभागी होणे आहे त्यांनी आपली नावे सदगुरु नराशाम महाराज  मठ संस्थान  येथे नोंदवावी असे आवाहन श्री सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
    मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथे श्री सदगुरु नराशाम महाराज यांचे जागृत  मठ संस्थान आहे.  या मठात संजीवनी समाधी आहे. मठसंस्थांनच्या वतीने विविध धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  चार धाम पैकी एक धाम असलेल्या श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन सदगुरु  नराशाम  महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 
ज्या भाविक भक्तांना भागवत कथा सोहळ्यात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे मठसंस्थांकडे नोंदवावीत. भाविकांनी आपला आधार कार्ड, दोन रंगीत फोटो आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. भाविकांनी आपली नावे श्री बाळू महाराज जोशी,  मठ संस्थान येवती 9823209205, श्री दत्तात्रय पाटील टाकळी 9511896552र, श्री पांडुरंग पाटील टाकळीकर 9823181245, श्री व्यंकट पदमवार नांदेड 9421841164, संतोष महिंद्रकर मुखेड 9422874738, राजू पाटील मोकासदरा 9404662888, नंदकुमार दाचावार बाराळी 9890974888, महेश घुमशेठवार नांदेड 9834144900, संतोष मेडेवार नांदेड 9423626651 यांच्याकडे नावे नोंदवावी व भागवत कथेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सदगुरु  नराशाम महाराज मठ संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या