आपल्याला जन्म दिलेल्या आई-वडिलांची नित्य नियमाने दररोज सेवा केली तर कोणत्याही दुसऱ्या देवाची पूजा करण्याची गरज नसून आई-वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी ईश्वरसेवा आहे यासाठी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करावी असे मत भागवताचार्य दशरथ महाराज अंभोरे पंढरपूरकर यांनी केले.
शंकरनगर येथे माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिरातील साईबाबा मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी प.पू.भागवतचार्य दशरथ महाराज आंभोरे(पंढरपूर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सद्गुरू सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमुगरेकर, १०८ सद्गुरू यदुबंन महाराज कोलंबीकर, सद्गुरू नराशम महाराज येवतीकर, सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुकर व संत महंतांच्या उपस्थित श्री साईबाबा मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर सपत्नीक श्री साईबाबा यांच्या मूर्तीचे विधिवत पूजा करून श्रींची महाआरती करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प.पू.108 श्री यदुबन गुरु गंभीरबन महाराज, गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर, गुरुवर्य सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर,परमपूज्य श्री नराशाम महाराज येवतीकर,आमदार राम पाटील रातोळीकर,आमदार जितेश अंतापुरकर,आमदार तुषार राठोड,माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी शिक्षण सभापती मिसाळे गुरुजी, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर,उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरुजी,माजी उपमहापौर सरजीतसिंग गिल,नायगावचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, बाळासाहेब पाटील खतगावकर,सभापती रवी पाटील खतगावकर,प्रा.बंडू पाटील चव्हाण,शिवाजी पाटील पाचपिळीकर, दीपक पावडे,राजीव गंदीगुडे,भास्कर पाटील भिलवंडे,आनंदराव बिराजदार गुरुजी, संभाजी पाटील भिलवंडे, बाबाराव पाटील भाले, शिवाजीराव कणकंटे,डॉ.आनंद पाटील खतगावकर,अनिल पाटील खानापूरकर,खुशाल पाटील उमरदरीकर,प्रमोद पाटील खतगावकर,ॲड.बाळकृष्ण शिंदे,एकनाथ पाटील वडगावकर, नंदू सावकार दासेटवार,दत्ता पाटील, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, प्रीतम देशमुख हाणेगावकर, शिवराज पाटील माळेगावकर, रमेश पाटील शेटकर,अतुल पाटील खतगावकर,नागेंद्र पाटील सांगवीकर, पत्रकार बाळासाहेब पांडे,पत्रकार गजानन चौधरी,बालाजी पाटील वनाळीकर,संतोष पाटील पुयड,रुपेश पाटील भोकसखेडकर,यांच्यासह नायगाव,बिलोली,देगलूर,उमरी धर्माबाद, मुखेड तालुक्यातील बहुसंख्य साईभक्त व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी खा. खतगावकर यांनी शंकरनगर येथे शिक्षण संस्था काढून गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करुन दिले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर , कलेक्टर पदावर पोहोचले असून येथील विद्यार्थ्यांना श्री साईबाबांचेही दर्शन घडावे व विद्यार्थी सुसंस्कारित व्हावा हा उद्देश दादांचा असुन असेच कार्य इतर नेते मंडळींनी केले पाहिजे असे मत सद्गुरू यदुबंन महाराज कोलंबीकर यांनी व्यक्त केले .तर सद्गुरू सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांनी म्हटले की दादा आपल्यामध्ये दानवत्व खूप मोठे आहे आणि आपण शंकरनगर येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे हा कारखाना आपण पुन्हा सुरू करावेत यासाठी आमचा अशिर्वाद तुम्हच्या पाठीशी असल्याचे सांगितले.यावेळी सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुकर, सद्गुरू नरआशम महाराज येवतीकर यांनीही उपस्थित भक्तांना अशिर्वाद पर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या भागातील व्यासपीठावर असलेले हे संत देव नाहीत परंतु ते देवा पेक्षा कमी नाहीत परंतु या व्यासपीठावरील सर्व संतांनी मला दादा म्हणून माझ्या पाठीवर आशीर्वाद दिला मी माझे भाग्य समजतो. संतांच्या संगतीत माणसाला जो आनंद मिळतो तो संतांची संगत नसलेल्या माणसाला तो माणूस कितीही मोठा झाला तो देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी त्यांना जो आनंद मिळू शकत नाही असे मत व्यक्त केले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन माजी मंत्री भास्कररावजी पाटील खतगावकर व माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी केले होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy