मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून भक्तापूर येथील सरपंच पद रद्द !

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
देगलुर तालुक्यातील भक्तापूर येथील ग्रामपंचायत सरपंच जिल्हाधिकारी नांदेड यांनी रद्दबादल ठरवले आहे. वर्ष जानेवारी 2021 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत शारदा उद्धव आयनलवार ह्या “भटक्या जमाती- ब” या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या.

त्यानंतर त्यांची भक्तापूर येथील ग्रामपंचायत सरपंच मधून निवड करण्यात आली होती. त्याविरुद्ध गावातील नागनाथ भुमा आयनलवार यांनी सदरील सरपंचाचे जात प्रमाणपत्र खोटे व पुरावाहीन असून सरपंच महिलेचे मूळ माहेर तेलंगणातील असून त्यांनी शासनाची दिशाभूल करत महाराष्ट्राची असल्याचे भासवून जात प्रमाणपत्र संबंधित विभागातून काढले असल्याचे सांगत त्यावर आक्षेप नोंदवला होता.
त्या नंतर दिनांक 22 मे 2022 रोजी जात वैधता प्रमाणपत्र समिती नांदेड यांनी संबंधित सरपंच महिलेची जात वैधता अवैध ठरवली होती. जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर तक्रारदार नागनाथ भुमा आयनलवार यांनी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे ॲड.सुरेश पिडगेवार तमलुरकर यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. संबंधित प्रकरणात वेळोवेळी सुनावण्या होऊन माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रतिवादी शारदा उद्धव आयनलवार यांचा सरपंच व सदस्य पदाचा उर्वरित काळासाठी रद्द केला आहे. या वेळी तक्रारदार.यांची सक्षम बाजू ॲड.सुरेश पिडगेवार तमलुरकर यांनी मांडली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या