भारत जोडो अभियानात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्या – युवा नेते रविंद्र पा. चव्हाण 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव मतदार संघातील युवक काँग्रेस व NSUI काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने युवकांची आढावा बैठक नायगाव मतदार संघातील युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या अधेक्षेतेखाली संपन्न झाली.

या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर (जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड)रवी पाटील खतगावकर,विठ्ठल पा. पावडे (शहराध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड)शशिकांत श्रीसागर (जिल्हा अध्यक्ष NSUI नांदेड) यांची उपस्थिती होती. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना पप्पू पाटील कोंडेकर यांनी भारत जोडो यात्रेची रुपरेषा यावर मार्गदर्शन युवकांना केले.
विठ्ठल पावडे यांनी आपल्या मनोगतात भारत जोडो अभियानामुळे नवचैतन्य निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करून युवकांनी भारत जोडो अभियानामध्ये सक्रियरित्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाची युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी भारताच्या स्वातंत्र्यात एक नव्हे दोन बलिदान देणाऱ्या गांधी घरयाण्याचे व काँग्रेस पक्षाचे योगदान देश उभारण्यामध्ये काँग्रेसची विचारधारा युवकांना सांगितली आज या सरकारच्या काळात युवक कसा भरकटला जात आहे त्याची उत्तम उदाहरने दिली आणि युवकांना आवाहन केले की येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ करण्यासाठी भारत जोडो अभियानामध्ये सहभागी व्हावे.
माता-भगिनी,विद्यार्थी,जेष्ठ मंडळी यांना सुद्धा सहभागी करण्यासाठी गाव तिथे सभेचे आयोजन करावे अशा सूचना गावातील सर्व युवकांना व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीसाठी उपस्थित पंकज पाटील चव्हाण (नगरसेवक न.प.नायगाव), बालाजी पा.कारेगावकर (जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड), रुद्रा पाटील कदम (मराठवाडा सोशल मीडिया समन्वयक) हणमंत पा.नरवाडे( तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद) बंडू पाटील बाबळीकर (कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद) अवधूत पा.सालेगावकर (जिल्हा सरचिटणीस), सुरज शिंदे (तालुका अध्यक्ष NSUI)दत्ताहरी लोहारे, संजय पा.चव्हाण(नगरसेवक) विठ्ठल बेळगे(नगरसेवक) संभाजी सज्जन, मारुती पाटील मोरे,शहाद्त पाटील गायकवाड, सुरेश जाधव, साईनाथ चनावार, गजानन पा.हासेकर, बालाजी पा.ढगे, विजय पा.भायेगावकरव, राजेश पा.ढगे, फुलाजी पाटील, गणेश पाटील, लक्षीमिकांत सावंत, रावसाहेब शिंदे व अनेक युवक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील वडगावकर यांनी तर सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले व कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन माणिक पाटील चव्हाण यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब शिंदे, शंकर चव्हाण, प्रशांत कोलमवर, सुरेश जाधव यांनी सहकार्य केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या