बिलोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी मिञ मंडळास भारत जोडो याञेसांठी मोठा प्रतिसाद

[ बिलोली प्रतीनिधी- सुनिल जेठे ]
बिलोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या फार्म हाऊस येथून शहरातील व तालुक्यातील नागरीक नवयुवक एकञ येऊन भारत जोडो याञेसाठी राहुलजी गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणत मोटारसायकलवर स्वार झाले.

यावेळी काँग्रेस सोबत जनशक्ती मोठ्या प्रमाणात दिसुन येत होती.या मोटारसायकल रॅलीत जनसमुदाय उसळला. मा.संतोष कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, न.प.उपाध्यक्ष मारोती पटाईत, उत्तमराव जेठे, नगरसेवक नितीन देशमुख, अमजत चाऊस, सामाजिक कार्यकर्ते वलिओदिन फारूखी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

या भारत जोडो याञेत मोठ्या संखेने नागरिक, नवयुक, महिला, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी महापुरुषांची वेषभुषा करून अनेक जण उभे होते.

 #BharatJodoYatra

ताज्या बातम्या