संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी भारत जोडो यात्रेत सामील व्हा – अशोकराव चव्हाण !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
देशात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्यामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे म्हणून त्यातील बंधुभाव एकता राहण्यासाठी संविधान व लोकशाहीचे रक्षण करणे हा भारत जोडो पदयात्रेचा उद्देश आहे म्हणून भारत जोडो यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राहुल गांधी यांचे हात मजबूत करावे असे राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी नायगाव येथील नियोजित बैठकीमध्ये आपले विचार व्यक्त केले.

नायगाव येथील जयराज पॅलेस भारत जोडो पदयात्रे निमित्ताने कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक दिनांक 31 सोमवार रोजी सायंकाळी राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, हे बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. वेळी प्रमुख मा.आ.वसंतरावजी पाटील चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, जेष्ठ नेते मारोतराव कवळे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, प्रदेश काँग्रेसचे सुरेंद्र घोडजकर, मीनाक्षी कागडे, श्रीनिवास पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, मा.सभापती संजय बेळगे, युवा नेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण, तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, दत्ताहारी पाटील चोळाखेकर, प्रल्हाद पाटील ढगे, यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, भारत छोडो यात्रा ही पण कश्मीर टू कन्याकुमारी पदयात्रा देशातील राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुलजी गांधी हे महाराष्ट्रात प्रथमच भारत जोडो यात्रेनिमित्ताने नांदेड जिल्ह्यात आगमन होत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी व या पदयात्रेत सामील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच या पदयात्रेमध्ये अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन नियोजित आढावा बैठकीत राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

यावेळी संजय पाटील शेळगावकर, संजय कुलकर्णी, युवक काँग्रेसचे बापूसाहेब कौडगावकर, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सय्यद इसाकभाई, बालाजी मद्देवाड, मनोहर पवार , गजानन चौधरी, जगदीश कदम, प्रवीण पाटील शिंदे कहाळेकर, बाबुराव अडकिने, गुणाजी पाटील शिंदे, प्रल्हाद पाटील शिंदे यांच्यासह नायगाव विधानसभचे नायगाव उमरी धर्माबाद तिन तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंखेने उपस्थित होते. तत्पूर्वी नरसी व नायगाव येथील यात्रा मार्गाची पहाणी केली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या