माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रा घुंगराळा येथे जनजागृती बैठक संपन्न !

● देशाचे नेते मा.खा.राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा 2022 !! ●

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली बरबडा सर्कल मधील घुंगराळा येथे म्हाळसाकांत खंडोबा मंदिराच्या पायथ्याची जाऊन नतमस्तक होऊन माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी भारत जोडो यात्रा जनजागरण रॅलीचे सुरुवात केली.

ग्रामपंचायत घुंगराच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात सर्व नागरिकांना बोलावून आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला भारत जोडो यात्रेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यासह कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करावे असे आव्हान आमदार माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी यावेळी केले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी मदेवाड, प्राचार्य मनोहर पवार,  ग्रा.पं.का.सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार, मोहन जोगेवार, रोहिदास पाटील, शिवाजी पाटील, पंडित पाटील, बालाजी तुरटवाड, ग्रामसेवक शिंदे असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या