भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे युवा नेते रवींद्र चव्हाण यांनी आव्हान केलं !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सहा नोव्हेंबर रोजी देगलूर मार्ग नायगाव नांदेड कडे जाणार आहे या यात्रेचे पूर्वतयारीची कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 16 ऑक्टोबर रविवार रोजी जनता हायस्कूल येथील बळवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात आली या बैठकीत भारत जोडो पदयात्रा ही नांदेड जिल्ह्यात सात दिवस राहणार असून सहा दिवस पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी एक दिवशी यशस्वीर घेण्यात आले यावेळी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये मोदी सरकारचे चुकीचे धोरण कसे आहे बेरोजगारी वाढ, सैनिकी भरती, शिक्षणावर बजेट , कृषीवर बजेट, आरोग्यावर बजेट ,पोषण बजेट, सार्वत्रिक रेशन व्यवस्था, नवीन भागात मनरेगा, शहरी रोजगार विभाग, पेट्रोल , डिझेल, गॅस वरील भाव वाढ गरिबांना गरिबी जास्त गरिबांना जीएसटी जास्त, श्रीमंतांना कमी जीएसटी, गरिबापेक्षा श्रीमंतांना कर्ज माफी जास्त आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आले काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पेट्रोल डिझेल गॅसवरील भाव वाढ कमी करणे मनरेगाची कामे ग्रामीण भागात वाढवणे शहरी भागात रोजगार देणे यावर मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाईल असे हे मत व्यक्त करण्यात आले भारत देश हा सुजलाम सुफलाम करण्यात येईल यावेळी,तुषार व निखिल यांनी सखोल मार्गदर्शन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या