भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोदकुमार वाघमारे यांची निवड.

[ नरसी : गणेश कंदुरके ]
नायगाव तालुक्यातील नामांकित बीएसएनएल कॉन्ट्रॅक्टर प्रमोदकुमार माधवराव वाघमारे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून आगामी निवडणूकीच्या तोंडावर निवड झाल्याने नरसी सर्कल मधून अनेकांनी शुभेच्छा वर्षाव केला.तसेच रणरागिणी प्रणिताताई देवरे चिखलीकर अन् भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकरांच्या उपस्थिती नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
    याप्रसंगी संघटन मंत्री संजयजी कोडगे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, गंगाधरजी जोशी, प्रणिता ताई देवरे, शिवराज पाटील होटाळकर, लक्ष्मण ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार,अँड देशमुख, भाजपचे नायगाव तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील,अनिल पवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर नरसी सर्कल सह जिल्ह्यात मोठे संघटना प्रमोद वाघमारे यांच्या पाठीशी असल्याने आगामी निवडणूकीत निश्चित भारतीय जनता पार्टी वाढण्याची संकेत आहेत. 
www.massmaharashtra.com
…………………………

ताज्या बातम्या