भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दिनेश दाचावार यांची निवड.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
नुकतेच शहरातील भाजपचे कार्यकर्ते तथा किराना असोशियनचे उपाध्यक्ष दिनेश दाचावार यांची भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली याबद्दल त्यांचावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.

 

कुंडलवाडी शहरातील प्रतिष्ठीत  व्यापारी दिनेश दाचावार यांनी मागील काळात पक्ष संघटनेत कार्यकर्ता म्हणून चांगली कामगिरी तथा जबाबदारी पार पाडली. पुढील काळात जबाबदारी यशस्वीरित्या पार पडावे अशी अपेक्षा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवीदास पाटील बोमनाळे (दक्षिण ) यांनी व्यक्त करून दाचावार यांना नियुक्तीचे पत्र बिलोली तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तथा भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते उमाकांत गोपछडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गुजरीकर, अतुल कवटीकवार मा.नगरसेवक ता.नायगाव यांच्या समक्ष नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्यांचा यानिवडीबद्दल दिनेश दाचावार यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्य कारनी ,राज्य कार्यकारणी, नांदेड जिल्हा कार्यकारणी ,तालुका कार्यकारणी,कुंडलवाडी शहर कार्यकारनी पदाधिकारी,सदस्य आदींचे आभार मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या