वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य, शिवसैनिकांनो कामाला लागा – लोकसभा पक्ष निरीक्षक शिंदे

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
नांदेड लोकसभा मतदार संघांसाठी वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल ते आम्हाला मान्य असून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा पक्ष निरीक्षक दिलीपराव शिंदे यांनी बिलोली येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत शिवसैनिक, शिवदूत, बूथप्रमुख यांना केले.

बिलोली येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी शिवसेना शिंदे गटाची लोकसभा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख मागासवर्गीय विभाग मंगेश कदम,तालुकप्रमुख बाबाराव रोकडे पाटील,भिमराव चौगुले, देगलूर तालुका प्रमुख घाळप्पा अंबेसंगे,जिल्हा उपप्रमुख महिला आघाडी सावित्राताई चप्पलवार, शिवाजीराव येडगुले, माजी नगरसेवक बिलोली महेंद्र गायकवाड,युवासेना तालूकाप्रमुख अरविंद पवनकर, शहरप्रमुख श्रीकांत गादगे, कुंडलवाडी शहरप्रमुख लक्ष्मण गंगोने, गंगाधर शिंदे, उमाकांत बादेवाड, बाळू जगदमवाड,शेतकरी सेना तालुका प्रमुख मारोती सिद्धपुरे, अरविंद पेंटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या आढावा बैठकीत लोकसभा निरीक्षक दिलीपराव शिंदे यांनी बिलोली तालुक्यातील गावनिहाय, बूथनिहाय माहिती घेतली असून बिलोली तालुका हा शिवदूत करण्यात अव्वल असल्यामुळे सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.सावळी ग्रामपंचायत सदस्य राहुल सावळीकर, रुद्रापूरचे ग्रामपंचायत सदस्य पवन गिरी, हनमलू तोटलवार , सचिन हिवराळे, बालाजी पांचाळ,सुरेश जाधव, शैलाताई कांबळे यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी असंख्य शिवसैनीक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com