अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बदल करतांना नायगाव तालुक्याला दोन अध्यक्ष दिले असून. उत्तर विभाग अध्यक्ष बालाजी मद्देवाड व दक्षिण विभाग श्रीहरी देशमुख नरंगलकर यांची निवड करण्यात आली. या निवड प्रसंगी आ. राजेश पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या आहेत.तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया भाजपच्या संपर्क कार्यालयात पार पडली असून जिल्हा सरचिटणीस माधवराव उच्चेकर यांनी निवडीची घोषणा केली आहे. बरबडा कुंटूर व नायगावची जबाबदारी बालाजी मद्देवाड तर नरसी मांजरमची जबाबदारी आ. राजेश पवारांचे निष्ठावंत श्रीहरी देशमुख नरंगलकर यांच्यावर सोपवण्यात आली.
भाजप तालुकाध्यक्ष निवडीला प्राचार्य मनोहर पवार, सरपंच रजित कुरे, शिवा गडगेकर, माधव कल्याण, महेश देशपांडे, सोपान पाटील, युवराज लालवंडीकर, राजु बेळगे, राजेंद्र कुचेलीकर, गंगाधर कल्याण, आवकाश धुप्पेकर, शिवाजी पळसगावकर, गजानन जुन्ने, परमेश्वर धानोरकर, गजानन कदम, नागोराव भेडेकर, परबतराव कुष्णुरकर, सोपान कदम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. बालाजी मदेवाड व श्रीहरी देशमुख नरंगलकर यांच्या नावाची घोषणा होतात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व दोघांनाही भावी कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy